धायरीतील वाहतूक कोंडीचा विळखा; अतिक्रमणांमुळे रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळेना!

0
IMG_20261009_18381069

दुहेरी पार्किंग, रस्त्यावरील खड्डे आणि खचलेल्या चेंबर्सची भर; धायरी फाटा ते धायरी गाव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुणे | शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ :

धायरी फाटा ते धायरी गाव मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असल्याचे चित्र समोर येत आहे. वाहनांच्या गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग काढताना अडचणी येत असल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचणार की नाही, असा चिंताजनक प्रश्न उपस्थित होत आहे.

या मार्गावरील अतिक्रमणे हा वाहतूक कोंडीचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. रस्त्याच्या कडेला होणारे अतिक्रमण, पथारी व्यावसायिकांमुळे व्यापली जाणारी जागा, दुहेरी पार्किंग आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे उपलब्ध रस्ता अरुंद होत असल्याची समस्या निर्माण होते. त्यातच रस्त्यावरील खड्डे आणि खचलेल्या चेंबर्समुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावतो. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांनाही मार्ग मिळणे कठीण होते.

अतिक्रमणांवर कारवाई कधी?

रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे, दुहेरी पार्किंगला आळा घालणे, खड्डे बुजवणे आणि खचलेल्या चेंबर्सची दुरुस्ती करणे यासाठी संबंधित महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज आहे. केवळ तात्पुरती वाहतूक व्यवस्था न करता रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासन ठोस पावले कधी उचलणार? अतिक्रमणमुक्त रस्ता, शिस्तबद्ध पार्किंग आणि प्रभावी वाहतूक नियोजनातून धायरीकरांना दिलासा मिळणार का, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed