वारजे-कर्वेनगरमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला हातगाड्या, टेम्पो अन् भाजी-फळ विक्री; पाहणी व कारवाईवर सवाल,अतिक्रमण वाढले; प्रशासन कुठे?

0
1790774616349

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कर्वेनगर चौक ते वारजे जकात नाका, वारजे हायवे चौक ते गणपती माथा परिसरात फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला अनधिकृत भाजी-फळ विक्रेते, हातगाड्या तसेच छोट्या टेम्पोंमधून व्यवसाय विक्रेते वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी टेबल व मालाची मांडणी केल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अतिक्रमण वाढत असताना संबंधित विभागाची नियमित पाहणी कुठे आहे? परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास येत असेल तर कारवाई का होत नाही? कारवाई होत असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू होण्यावर नियंत्रण का राहत नाही?
हॉकर्स झोन नेमका कुठे? विक्रेते अधिकृत की अनधिकृत? याची स्पष्ट माहिती प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे. अधिकृत विक्रेत्यांसाठी निश्चित जागा आणि नियमबाह्य अतिक्रमणावर सातत्यपूर्ण कारवाई याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.
फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण रोखणे, वाहतुकीला अडथळा टाळणे आणि सार्वजनिक जागेचे संरक्षण करणे ही जबाबदारी कोणाची? वारजे-कर्वेनगरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाहणी, कारवाई आणि कारवाईनंतरच्या नियंत्रणाबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed