पुण्यात घर भाड्याने देताना सावधान! पोलिस पडताळणी न करणाऱ्या १७० हून अधिक घरमालकांवर गुन्हे

0
IMG_20260818_163010

Oplus_16908288

पुणे : शहरात घर, फ्लॅट किंवा खोली भाड्याने देणाऱ्या घरमालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाडेकरूची आवश्यक माहिती पोलिसांना न देणे किंवा त्याची पडताळणी न करणे घरमालकांना चांगलेच महागात पडू शकते. पुण्यात अशा निष्काळजीपणाच्या प्रकरणांत १७० हून अधिक घरमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
घर भाड्याने देताना केवळ भाडेकरूशी करार करणे पुरेसे नसून त्याची ओळख, कायमचा पत्ता, ओळखपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. भाडेकरूची पार्श्वभूमी आणि कागदपत्रांची सत्यता याबाबत योग्य ती खातरजमा न केल्यास भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास घरमालकांसाठीही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
पुणे पोलिसांकडून भाडेकरू पडताळणीबाबत वारंवार जनजागृती केली जात असतानाही काही घरमालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
भाडेकरू कोण आहे? त्याचा कायमचा पत्ता काय आहे? त्याने दिलेली कागदपत्रे खरी आहेत का? पोलिस पडताळणी केली आहे का? हे प्रश्न घर भाड्याने देण्यापूर्वी प्रत्येक घरमालकाने गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे.
पोलिस पडताळणी न केल्यास घरमालकांवर नेमकी कोणती कारवाई होऊ शकते आणि भाडेकरू ठेवताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत डीसीपी प्रशांत अमृतकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
घरमालकांनी ‘भाडे मिळाले म्हणजे झाले’ या भूमिकेपेक्षा सुरक्षितता आणि नियमांचे पालन याला प्राधान्य देण्याची गरज या कारवाईमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed