शनिवार पेठेत रस्त्यावर पडलेला खड्डा ठरतोय धोकादायक; मुठेश्वर मंडळ परिसरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

0
FB_IMG_1786349388038

पुणे | शनिवार पेठ : मुठेश्वर मंडळ परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्ड्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासला जातो का? खड्डे पडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब होत असल्याने विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी प्रशासनाने आताच या खड्ड्याची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. संबंधित विभागाने खड्डा तातडीने बुजवून रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासन आता गांभीर्याने पाहणार का?

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply