पुणे : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आनंदनगर, सनसिटी सर्व्हिस रोड तसेच पुढे प्रयेजा सिटी डी.पी. रोडकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरुवातीलाच फळ विक्रेते आणि खेकडे विक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याचे चित्र दिसत आहे. वाहतुकीसाठी असलेला रस्ता हळूहळू विक्रीच्या जागेत बदलत असताना संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे मार्ग अरुंद होत असून वाहतुकीचा वेग मंदावतो. गर्दीच्या वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या अनधिकृत विक्रीवर कारवाई का होत नाही? अतिक्रमण विभाग आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय या प्रकाराकडे डोळेझाक करत आहे का? रस्ते मोकळे ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोण पार पाडणार? अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
रस्ता हा वाहतुकीसाठी की अनधिकृत विक्रीसाठी, असा प्रश्न आता या परिसरातील परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या अतिक्रमणावर कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४

