ससूनचे माजी अधीक्षक डॉ. अजय तावरे किडनी रॅकेटप्रकरणी अटकेत; रुबी हॉल क्लिनिक प्रकरणात मोठी कारवाई

63-19821125-1.webp

पुणे, २९ मे — पुण्यातील गाजलेल्या किडनी रॅकेट प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना ताब्यात घेतले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उघडकीस आलेल्या किडनी रॅकेटमध्ये डॉ. तावरे यांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोल्हापूरमधील एका महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून, तिने एका रुग्णाच्या पत्नी असल्याचे भासवले आणि एका तरुण रुग्णाला आपली किडनी दान केली होती. त्याच्या बदल्यात त्या तरुणीच्या आईने संबंधित रुग्णाला किडनी दिली होती. ही शस्त्रक्रिया २९ मार्च २०२२ रोजी पार पडली. मात्र, काही दिवसांतच पैशांवरून झालेल्या वादामुळे महिलेनं आपली खरी ओळख उघड केली. त्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना कळवले आणि प्रकरण आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले.

या प्रकरणात डॉ. अजय तावरे यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. ते ससून रुग्णालयाचे अधीक्षक असताना त्यांनीच किडनी देणाऱ्याची व घेणाऱ्याची मुलाखत घेतली होती आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. तावरे हे त्या वेळी रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच बनावट कागदपत्रांना मंजुरी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

डॉ. तावरे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार आहे. सध्या ते गेल्या वर्षभरापासून पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता त्यांच्यावर किडनी रॅकेटप्रकरणी आणखी एक गंभीर आरोप झाला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Spread the love

You may have missed