पुणे : हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपी पळून गेल्याने पोलीस निलंबित !

n58971940217098773541059a8d3e10a82dd01fba292b976435ff0a9460287db424ef47a7f88db70a864042.jpg

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरल्याच्या प्रकरणी २ जुलै रोजी हडपसर पोलिसांनी धृपदा भोसले हिला अटक केली होती. परंतु, ३ जुलैला भोसले पोलिसांचा नजर चुकवून पळून गेली.या घटनेत कर्तव्यात निष्काळजीपणा आणि जबाबदारीचे पालन न केल्यामुळे महिला पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिसदलाची प्रतिमा मलीन झाली असून, अशा अकार्यक्षम पोलिसांमुळे संपूर्ण दलावर परिणाम होतो. पोलीसदलात अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिष्ठा कमी होत आहे.

Spread the love

You may have missed