पुणे: खराडीत मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय; दोघांवर गुन्हा, सहा महिलांची सुटका

d49f98f3-fcbb-48eb-b097-76b258661fe1.jpg

पुणे, प्रतिनिधी : खराडी – मुंढवा रोडवरील थिटेनगर येथील गोल्ड प्लाझा इमारतीत सिल्व्हर सोल स्पा ब्यूटी ॲन्ड वेलनेस या मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. खराडी पोलिसांनी कारवाई करून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. खात्री झाल्यानंतर उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सेंटरवर छापा टाकला. पथकात पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अर्जुन बुधवंत, अमोल भिसे, सचिन पाटील, अक्षय गार्डे, सूरज जाधव, जयवंत श्रीरामे तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती मेमाणे, पूजा डहाळे, अर्चना गोफणे सहभागी होत्या.

गुन्हा दाखल; मुख्य आरोपी अटकेत
या कारवाईत मसाज सेंटर चालवणारा लेनखोकै किपगेन (रा. मणिपूर) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विकास किशोर ढाले (रा. अमरावती) याचा पोलीस शोध घेत आहेत.

सहा महिलांची सुटका
सेंटरमधून सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांमध्ये तीन महिला थायलंडच्या, एक मणिपूरची, एक नागालँडची व एक पुण्याची असल्याचे समोर आले आहे. सर्व महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार पूजा डहाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.


Spread the love

You may have missed