येरवडा भाटनगरचे प्रेमीयुगलः पिंपरीत प्रेयसीची हत्या, प्रियकराची आत्महत्या

0

पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या खराळवाडी परिसरात एका हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे.

घटना दुपारी साडेचारच्या सुमारास हॉटेल राज प्लाझामध्ये घडली. नितेश नरेश मिनेकर (वय ३४, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास नितेश व तरुणी हॉटेलमध्ये आले होते व त्यांनी रूम बुक केली. काही वेळातच दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. हॉटेल व्यवस्थापकाने संशय आल्यामुळे पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडावा लागला. आतमध्ये तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, तर नितेशने गळफास घेतला होता.

पिंपरी पोलीस या घटनेचा तपास करत असून, या प्रकरणामागे प्रेमसंबंधातील वाद असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed