पुणे शहर: महर्षीनगर मध्ये मनसेकडून शिक्षकाला मारहाण, मुलांबाबत शाळेने खबरदारी घेण्याचे मनसेचे आवाहन, व्हिडिओ व्हायरल

n6338681121728196465002789dc7077854c4fc23807195ce2552ebeaae69d164f1ec218a0a50b50be81f13.jpg

पुणे, ६ ऑक्टोबर: शर्ट नीट न खोचल्याच्या कारणावरून एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथे घडली. या घटनेत विद्यार्थी रक्तबंबाळ झाला असून, पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



शिक्षक संदेश भोसले (वय २६) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी संगणक अभ्यासक्रमाच्या वर्गात ही घटना घडली. तक्रारदाराच्या अकरा वर्षीय मुलाने शर्ट नीट खोचला नसल्याने शिक्षकांनी संतापून त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाच्या नाक व कानातून रक्तस्त्राव झाला.

घरी पोहोचल्यानंतर पालकांनी मुलाची स्थिती पाहून विचारपूस केली असता, शिक्षक भोसले यांनी मारहाण केल्याचे समोर आले. पालकांनी तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिक्षकाला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Spread the love

You may have missed