रस्ता खचला की कामाचा दर्जा उघड झाला? पावसाळी वाहिनीचे काम झाले, रस्ता दुरुस्त झाला; मग पाइपलाइनचे पाणी लागताच भराव का खचला?

0
IMG20261003124608

oplus_0

वारजे, ३ ऑक्टोबर : वारजे-माळवाडीतील सह्याद्री शाळा ते रामनगर मार्गावरील कालवा रस्त्याचा सुमारे सहा फूट लांब आणि पाच फूट खोल भाग खचल्याने महापालिका प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाइपलाइनच्या तपासणीदरम्यान मोठ्या दाबाने सुमारे तासभर पाणी बाहेर पडले आणि त्यानंतर रस्त्याचा भराव खचला.
मागील वर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सोडविण्यासाठी पावसाळी वाहिनी टाकण्यात आली. काम अर्धवट राहिल्यानंतर यंदा जूनपूर्वी पुन्हा वाहिनी टाकण्यात आली. मात्र, त्यानंतरही रस्त्यावर भेगा पडत होत्या आणि काँक्रीट उखडत होते.
मग रस्त्याची दुरुस्ती नेमकी कशी करण्यात आली? काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली होती का? रस्त्याखालील पाइपलाइन आणि पावसाळी वाहिनीच्या कामांमध्ये आवश्यक समन्वय होता का?
पाइपलाइनच्या तपासणीदरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह सुरू होताच रस्त्याचा भराव खचला, तर रस्त्याच्या मजबुतीची तपासणी आधीच का झाली नाही? नागरिकांच्या जीविताला किंवा वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईपर्यंत प्रशासन वाट पाहणार का?
आता खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती कोणत्या विभागाच्या माध्यमातून आणि किती कालावधीत केली जाणार? पुन्हा त्याच ठिकाणी थातुरमातुर दुरुस्ती करून प्रश्न मिटवला जाणार की या संपूर्ण कामाची गुणवत्ता आणि जबाबदारी निश्चित केली जाणार?
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या मार्गावर निर्माण झालेला धोका तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, समान पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed