पुणे: महा ई-सेवा केंद्रातील चालक आणि महिला ऑपरेटर ५ हजार रुपये लाच घेताना अटक

n40550177892c66610b8df043e15f43d5d6238cca83f8d0aaa74cad43b0b4160690ae5a9f4.jpg

पुणे – उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ५ हजार रुपये लाच घेताना दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई-सेवा केंद्राच्या चालकासह महिला कॉम्प्युटर ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

संतोष बबन वाळके (वय ४८) आणि नंदा राजू शिवरकर (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ५४ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदारांनी उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गुरुदेव दत्त महा ई-सेवा केंद्रात संपर्क केला असता, वाळके आणि शिवरकर यांनी तहसील कार्यालयातील ओळखीतून हे प्रमाणपत्र जलद मिळवून देण्याच्या बदल्यात ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीच्या पडताळणीत वाळके आणि शिवरकर यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केली, आणि नंदा शिवरकर यांनी २,५०० रुपये लाच स्वीकारल्याचे आढळले. त्यानुसार, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Spread the love

You may have missed