पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रोडच्या गणपती डेकोरेशनला अचानक लागली आग; पुढे काय घडलं? पाहा Video

IMG_20240919_101741.jpg

पुण्यातील लक्ष्मी रोड गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान डेकोरेशनला आग; मोठा गोंधळ, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे: गणपती उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रोडवर असलेल्या प्रसिद्ध ‘याली लक्ष्मी रोड’ गणपतीच्या डेकोरेशनला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

आगीमुळे उपस्थित भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अनेकांनी जवळपास असलेल्या पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. एका धाडसी व्यक्तीने डेकोरेशनच्या ज्या भागाला आग लागली होती, तो भाग काढून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आगीचा प्रसार रोखता आला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र डेकोरेशनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आल्यानंतर, गणेश भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करत उत्सव पुढे सुरू ठेवला.

पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तपास सुरू आहे.

पहा व्हिडिओ

Spread the love