महसूल दाखले मिळवण्यासाठी केंद्रांमध्ये जाण्याची गरज नाही – “सेवादूत” घरीच सेवा देणार

0
n6598069941744606524837d45ee7ce263d30a372fb085657b45b350660a04be837b75ed8237b4715361dcb.jpg

पुणे, प्रतिनिधी :जिल्ह्यात महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी “सेवादूत” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आता नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी सेवा केंद्रात जायची गरज राहणार नाही. नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सेवादूत घरी येऊन आवश्यक कागदपत्रांची स्कॅनिंग करणार असून, अर्ज प्रणालीमध्ये समक्ष भरून घेण्यात येणार आहे. तयार झालेला दाखला घरपोच किंवा टपालाद्वारे पाठवला जाईल.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांचीही उपस्थिती होती.

सध्या वयोवृद्ध, दिव्यांग व नोकरदार वर्गाला महसूल सेवा मिळवणे अडचणीचे ठरत असल्याने, “सेवादूत” उपक्रमातून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांना या सेवेसाठी ठराविक शुल्क भरावे लागणार आहे.

कार्यप्रणाली कशी आहे?
नागरिकांनी sevadoot.pune.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आपले सरकार सेवा केंद्राचे चालक नागरिकांच्या घरी येऊन कागदपत्रे स्कॅन करून अर्ज पूर्ण करतील. ही सेवा पारदर्शक व जलद असल्याने सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

You may have missed