पिंपरीत ड्रग्जविरोधात धडक कारवाई, नऊ किलो गांजासह आरोपी पकडला

0
untitled-10-1670574652.webp

पुणे: पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने च-होली भागातील कुख्यात गुन्हेगार भरत दशरथ वाघमारे (३९) याला ५,३३,९०० रुपये किमतीचा ९ किलो ४७८ ग्रॅम गांजासह रंगेहात पकडल्यामुळे अटक केली आहे . पीएसआय विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयूर वाडकर, गणेश करपे, विजय दौंडकर, निखिल वरपे आणि रमेश करकरे यांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिस च-होली बुद्रुक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दाभाडे सरकार चौकीजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या थांबलेला दिसून आला.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना पोत्यात ठेवलेला 9 किलो गांजा सापडला, पोलिसांना पोत्यात गांजा आढळून आल्यामुळे पोलिसांनी वाघमारेला अटक केली. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली. वाघमारेवर गुन्हेगारीचे 3 गुन्हे दाखल आहेत, २०२४ मध्ये त्याच्याविरुद्ध चाकण मध्ये दोन आणि खडक पोलिस ठाण्यात 1 असे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर दिघी पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, वाघमारेवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस या तस्करीच्या स्रोताचा आणि नेटवर्क संबंधांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed