येरवडा परिसरात शोककळा; माजी नगरसेविका शशीकला आरडे यांचे निधन

0
IMG_20250414_130555.jpg

पुणे – लक्ष्मीनगर, येरवडा येथील रहिवासी आणि माजी नगरसेविका शशीकला सुदाम आरडे (वय ६८) यांचे आज, सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व स्थानिक स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

अत्यंतविधी आज दुपारी 4 वाजता लक्ष्मीनगर, येरवडा येथून सुरू होऊन येरवडा गूंजन टॉकीज चौकातील अमरधाम स्मशानभूमीत पार पडणार आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा माजी नगरसेवक संतोष सुदाम आरडे, मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शशीकला आरडे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवत अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिक नागरिकांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

You may have missed