दुधनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सामाजिक कार्यकर्ते आझम भाई शेखजी यांचे योगदान उल्लेखनीय

दुधनी (जि. सोलापूर) – दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम युवा संघटनेचे अध्यक्ष आझम भाई शेखजी यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व भीमसैनिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे आणि जिल्हा आर.पी.आय. गटाचे उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला.
पहा व्हिडिओ
या प्रसंगी दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ डोधमानी, मुस्लिम अल्पसंख्याक अध्यक्ष महेदीमिया जिडगे, शिव गायकवाड, निंगप्पा निंबाळ, कासू लोडेनवरू, भीमा झळकी, सातलिंग निंबाळ, धर्मा शिंगे, इब्राहिम अत्तार, अशपाक मुजावर, वाशिम पटेल, महिबूब मोमीन, सद्दाम शेख, मुनीर अत्तार, इनुस बडेखा, फिरोज पठाण, अली जिडगे यांच्यासह अनेक भीम सैनिक उपस्थित होते.
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनीही वातावरण भारावून गेले. दुधनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आझम भाई शेखजी यांचे दुधनी ग्रामस्थांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.