‘हिस्सा भेटला नाही म्हणून कारवाई?’ हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान कथित संभाषणाचा व्हिडिओ समोर

0

हडपसर : अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असतानाच ‘हिस्सा’, मासिक रक्कम आणि पैशांच्या व्यवहाराची चर्चा होत…

Spread the love
IMG_20260904_160119

हडपसर : अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असतानाच ‘हिस्सा’, मासिक रक्कम आणि पैशांच्या व्यवहाराची चर्चा होत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आल्याने हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त व्हिडिओमध्ये अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि टेम्पो चालक-पथारी व्यावसायिक यांच्यात संभाषण होताना दिसते. या संभाषणात “पंधरा तारखेला दिड हजार रुपये”,महिन्याचे तीन हजार रुपये” तसेच काही व्यक्तींना रक्कम दिल्याचा दावा करण्यात आल्याचे ऐकू येते. याचवेळी “इथला हिस्सा भेटलेला नाही” असा उल्लेखही झाल्याचे दिसते.
यामुळे अतिक्रमण कारवाईच्या प्रक्रियेबाबत थेट प्रश्न उपस्थित झाला आहे—कारवाई नियमभंगामुळे होते की कथित ‘हिस्सा’ न मिळाल्याने? जर संभाषणातील दाव्यांमध्ये तथ्य असेल, तर या कथित आर्थिक व्यवहारांचा अतिक्रमण कारवाईशी नेमका संबंध काय, याचा तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान, व्हिडिओतील संभाषणात कारवाईसाठी अधिकारी आल्याचा उल्लेख असल्याने संबंधित कारवाईच्या अधिकृत नोंदी आणि व्हिडिओतील दाव्यांची पडताळणी केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते.
प्रशासन उत्तर देणार का?
या प्रकरणात व्हिडिओची सत्यता, संभाषणाचा संपूर्ण संदर्भ आणि कथित आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महापालिका अतिक्रमण विभाग प्रशासन या व्हिडिओची दखल घेऊन चौकशी करणार का? हा आता मुख्य सवाल आहे.
महत्त्वाचे म्हणजे, व्हिडिओतील आर्थिक व्यवहारांबाबतचे उल्लेख हे संभाषणातील व्यक्तींचे दावे आहेत; त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. मात्र, कारवाईदरम्यान ‘हिस्सा’ आणि पैशांबाबत झालेल्या कथित चर्चेने अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed