पोलिसांची दिशाभूल करून पब सुरू ठेवणे भोवले! कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ पबला टाळे

0
IMG_20261104_111951

पुणे : निर्धारित वेळेचे उल्लंघन करून मध्यरात्रीनंतरही पब सुरू ठेवणे कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ (Plunge) पबच्या व्यवस्थापनाला चांगलेच भोवले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पबला पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या तपासणीदरम्यान पब बंद असल्याचे सांगून काही वेळातच तो पुन्हा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, कोरेगाव पार्कमधील प्लंज पब रात्री दोन वाजल्यानंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस मार्शल नियमित तपासणीसाठी पबमध्ये गेले होते. त्यावेळी व्यवस्थापनाकडून पब बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस मार्शल तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच पब पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांच्या तपासणीदरम्यान बंद असल्याचे सांगायचे आणि पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू करायचा, अशा प्रकारामुळे पब व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या आदेशांना आणि निर्धारित वेळेच्या नियमांना केराची टोपली दाखवण्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

पोलिसांची दिशाभूल करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब व्यवस्थापनावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत प्लंज पब बंद राहणार आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed