बिबवेवाडी, के. के. मार्केट रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात;तक्रारी करूनही प्रशासन नेमके करतेय काय?प्रशासनाचे लक्ष कुठे?

0
IMG_20261006_14494274

पुणे, दि. ६ : बिबवेवाडीतील के. के. मार्केट रस्त्यावर अनधिकृत स्टॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत बदल होत नसल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यासंदर्भातील एका नागरिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्सबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाजारपेठेत स्टॉलसाठी भाडे व डिपॉझिट द्यावे लागते; मग सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने व्यवसाय करण्यास कशी मुभा मिळते, असा सवाल नागरिकाने केला आहे.
वारंवार तक्रारी होऊनही अतिक्रमण वाढत असेल, तर कारवाई नेमकी कुठे थांबते? असा प्रश्न उपस्थित करत संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाने पाहणी करून नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed