येरवड्यात अनधिकृत रक्त तपासणी केंद्रांचा सुळसुळाट; मनपा आरोग्य विभागाच्या कारवाईकडे लक्ष

0
IMG_20261003_005137

येरवडा: महाराष्ट्र माझा न्युज – येरवडा, गांधीनगर, लक्ष्मीनगर आणि चंदननगर परिसरात कोणतीही शैक्षणिक पात्रता व अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत खाजगी रक्त तपासणी (पॅथॉलॉजी) केंद्र चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुकीच्या चाचणी अहवालांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या केंद्रांची नियमित तपासणी करतात का, त्यांची नोंदणी व परवान्यांचे नूतनीकरण तपासले जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे. नियमबाह्य चालणाऱ्या या केंद्रांवर मनपा अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन तातडीने कडक तपासणी मोहीम राबवावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed