ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. एकनाथ पवार; राज्य शासनाने काढले आदेश

eknath-pwakw8202_2024061252892.jpg

पुणेतील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सेवेतून निलंबित केले होते, तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

या घटनेनंतर बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता डॉ. म्हस्के यांच्या जागी जे जे रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

पोर्शे कार अपघातानंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. डॉ. पवार मागील वीस वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असून त्यांनी ९ वर्षे जे जे रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागात सेवा बजावली आहे. शासनाच्या आदेशानुसार ते शुक्रवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Spread the love

You may have missed