पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा फ्लेक्स महत्त्वाचे आहेत का?
मुख्य एनडीए रोडवरील सह्याद्री शाळेजवळील चौकात उभारलेला फ्लेक्सचा सांगाडा एका बाजूने वाकलेला असून तो कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार?
वारजे जकात नाका ते चर्च कॅनॉल रोड, मुख्य एनडीए रोड तसेच परिसरातील अनेक रस्त्यांवर काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत दिव्यांच्या खांबांवरही व्यावसायिक फ्लेक्स बोर्ड लावलेले दिसून येत आहेत. चौकांमध्ये मोठे फ्लेक्स सांगाडे उभारलेले असून ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसात हे सांगाडे कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, संबंधित विभाग, कर्मचारी व अधिकारी यांनी तातडीने या धोकादायक व अनधिकृत फ्लेक्स सांगाड्यांची पाहणी करून ते हटविण्याची कारवाई करावी. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणार, की अपघाताची वाट पाहणार?
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४