लोकमतचे पत्रकार सुरेश वांढेकर यांचा नवज्योतसिंग सिद्धू यांच्या हस्ते गौरव.

0
IMG_20260802_113705

पुणे: महाराष्ट्र माझा न्युज- ‘दैनिक लोकमत’चे प्रतिनिधी सुरेश वांढेकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू,अभिनेते आणि विनोदी कलाकार नवजोत सिंग सिद्धू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सुरेश वांढेकर यांनी ११ वर्षे ‘दैनिक लोकमत’मध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत राहून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारिता तसेच लोकमत समूहाच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी ‘दैनिक लोकमत’चे संपादक संजय आवटे, व्यवस्थापक अमित राठोड,मुख्य व वरिष्ठ बातमीदार उद्धव धुमाळे तसेच पत्रकार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-
सन्मान स्वीकारल्यानंतर सुरेश वांढेकर यांनी हा गौरव अधिक जबाबदारीने, निष्ठेने आणि तत्परतेने पत्रकारिता करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली. तसेच या सन्मानासाठी ‘दैनिक लोकमत’ व्यवस्थापन,वरिष्ठ अधिकारी, सहकारी, हितचिंतक आणि वाचकांचे त्यांनी आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed