“स्टिंग ऑपरेशन की ‘शर्मिंग ऑपरेशन’?” पुण्यात पत्रकारांची कृत्ये उघड!
पुणे, प्रतिनिधी:
पत्रकारितेच्या नावाखाली सत्य उघड करण्याचा दावा करणाऱ्यांचाच चेहरा आता काळवंडल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. बुधवार पेठ परिसरात स्टिंग ऑपरेशनच्या आडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, “सत्याचा शोध” घेणारेच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत
या प्रकरणी जय महाराष्ट्र चॅनलचा रिपोर्टर रोहन कदम याच्यासह इतर तीन जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “स्टिंग”च्या नावाखाली नेमकं काय सुरू होतं, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

घटनेनंतर पत्रकारितेच्या पवित्र व्यवसायावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजाला आरसा दाखवण्याची जबाबदारी असणारे काही जणच जर अशा कृत्यांत गुंतले, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, “ब्रेकिंग न्यूज”च्या हव्यासापोटी काही जण मर्यादा ओलांडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी लगाम घालण्यास सुरुवात केली असून, “खरी पत्रकारिता” आणि “खोटी नाटके” यामधील फरक आता स्पष्ट होताना दिसत आहे.
पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी लगाम घालण्यास सुरुवात केली असून, “खरी पत्रकारिता” आणि “खोटी नाटके” यामधील फरक आता स्पष्ट होताना दिसत आहे.