पुणे: नियमभंगामुळे गॅस एजन्सीचा पुरवठा बंद; जादा दराने विक्री व नियमबाह्य वाटप उघड

0
LPG-gas-_V_jpg-1280x720-4g.webp

पुणे: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वितरणात नियमभंग केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने हिंजवडी येथील ‘मे. श्री लक्ष्मी भारतगॅस’ या गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करत पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद केले आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, २६ मार्च २०२६ रोजी वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन करण्यात आले नाही. अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे तसेच अधिक नफा मिळविण्यासाठी जादा दराने विक्री केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई केली. संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी BPCL ला आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed