पुणे: “हप्ता दे नाहीतर दुकान बंद” – अन्न धान्य अधिकाऱ्याचा दुकानदाराला दम; दरमहा दहा हजारांची मागणी – व्हिडिओ

0
IMG_20250630_113407.jpg

पुण्यात अन्न धान्य वितरण अधिकाऱ्याचा ‘हप्ता’ प्रताप; दुकानदाराला त्रास सहन न झाल्याने दुकान बंद करण्याचा निर्णय

पुणे – शहरातील मार्केट यार्डमधील प्रेम नगर भागात स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराने केलेल्या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. अन्न धान्य वितरण विभागाचे अधिकारी प्रशांत खताळ यांनी दरमहा १० हजार रुपयांचा ‘हप्ता’ मागितल्याचा गंभीर आरोप या दुकानदाराने केला आहे.

“दरमहा दहा हजार रुपये द्या, नाहीतर तुमचे दुकान बंद करून टाकू,” अशी थेट धमकी संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या आर्थिक मागणीच्या त्रासाला कंटाळून अखेर संबंधित दुकानदाराने आपले दुकान बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

पाहा व्हिडिओ

Link source: newsdotz

या प्रकरणामुळे अन्न धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. गरीबांसाठी सुरू असलेल्या स्वस्त धान्य योजनेचा फायदा खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नसले तरी दुकानदाराने लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे.

या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed