नागरिक झाले हैराण; कॅन्टोन्मेंट अतिक्रमण विभागाचे अधिकारी झाले मालामाल ! ; हातगाड्यांच्या आड अतिक्रमण विभागाचा ‘दर आठवड्याचा पगार’

पुणे । प्रतिनिधी
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनधिकृतपणे उभ्या राहत असलेल्या हातगाड्या, टेम्पो आणि लहानमोठ्या व्यावसायिक गाड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमांड हॉस्पिटल कोंढवा रोड वर असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या या बेकायदेशीर गाड्यांवर कॅन्टोन्मेंटच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या व्यवसायिकांशी मिलीभगत असून, दर आठवड्याला ठराविक रक्कम ‘हफ्ता’ म्हणून घेतली जाते. त्यामुळे कायद्यानं निषिद्ध असलेल्या या व्यवसायांना खुलेआम संरक्षण दिलं जात आहे.
पहा व्हिडिओ




या पार्श्वभूमीवर नागरिकांनी थेट सी.ओ. (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर) आणि ब्रिगेडियर साहेबांकडे प्रश्न उपस्थित केला आहे – “बेकायदेशीर हातगाड्या, टेम्पोंवर कारवाई केव्हा होणार?”
नियमित तक्रारी करूनही अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करत असल्याने, या मागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
“रस्ता आमचा, धंदा त्यांचा, फायदा अधिकार्यांचा!” अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
संबंधित वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, आणि अतिक्रमण विभागातील भ्रष्ट कारभारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.