सासवडमध्ये अवैध दारू आणि हुक्का विक्रीचा धक्कादायक प्रकार — नागरिक संतप्त, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सासवड, प्रतिनिधी | सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रात्रीच्या अंधारात अवैध दारू आणि हुक्क्याची सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासवडमधील हॉटेल ताहिती द ग्रँड डेस्टिनी या ठिकाणी कोणताही अधिकृत परवाना नसतानाही मद्यविक्री सुरू आहे, तसेच हुक्का पार्लरही बिनधास्त चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
पहा व्हिडिओ



हा प्रकार गंभीर असून, मद्य आणि हुक्क्याच्या सेवनामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“परवाना नसताना दारू विक्री केली जात आहे, हुक्का पार्लरही खुलेआम चालत आहे, पण पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हे अवैध व्यवसाय फोफावत आहेत. त्यामुळे या प्रकरणी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल होणार का? तसेच एसीपी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालणार का? हे महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.