पुणे महापालिकेची प्रभागरचना नवी, तर पिंपरी चिंचवडमध्ये ‘जैसे-थे’; राज्य सरकारचा निर्णय जाहीर; चार सदस्यीय प्रभागपद्धतीनेच होणार महापालिका निवडणुका

0
pmc.jpg

पुणे, दि. ४ जून – राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी नवी प्रभागरचना केली जाणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मधील प्रभागरचनाच कायम ठेवण्यात येणार आहे. हद्दवाढ झालेल्या महापालिकांसाठी नवी प्रभागरचना तर उर्वरित महापालिकांसाठी जुनीच रचना लागू राहणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाला असून, पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रभाग रचना जाहीर करण्याची मुदत मंगळवारी संपली असून त्यानुसार आज प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध होणार आहे.

राज्य सरकारने महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ मध्ये या पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर अनेक महापालिकांच्या सीमा वाढवण्यात आल्या असून काही महापालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग होते.

पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नव्याने महापालिकेचा दर्जा मिळालेल्या इतर शहरांमध्ये चार सदस्यीय नवी प्रभागरचना केली जाणार आहे. दुसरीकडे, पिंपरी चिंचवडसह १७ महापालिकांमध्ये २०१७ मधीलच प्रभागरचना कायम राहणार आहे. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड रचनेस मान्यता देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या निर्णयाला महत्त्व असून सर्वच राजकीय पक्षांनी त्यानुसार तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचनेचा अधिकृत सविस्तर कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed