पुणे : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या वंचित बहुजन माथाडी चे विशाल सरवदे यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा

0

पुणे : कोथरूड प्रतिनिधी ता.१२ कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी कामाच्या वेळेत हजर नसताना आढळून आलेले आहेत महापालिका नियमानुसार कार्यालय सुरू होण्याची वेळ सकाळी पावणेदहा अशी आहे प्रत्यक्ष दहा नंतरही येथे अधिकारी हजर नसतात भोजनाची वेळ दुपारी दोन ते अडीच अशी असतानाही तीन वाजून गेले तरी अधिकाऱ्याच्या खुर्च्या रिकामा दिसतात तसेच कार्यालय बंद होण्याची वेळ सायंकाळी सव्वा सहा असताना सर्व अधिकारी व कर्मचारी पाच वाजल्यापासून घरी जाण्याची घाई सुरू झालेली असते कार्यालयात नागरिकांनी अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ दर्शनी भागात दिसेल अशा पद्धतीने लिहिणे बंधनकारक आहे तसेच अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले असतील तर हालचाल नोंदवहीत लिहिणे गरजेचे असताना येथे नियमाचे पालन होताना दिसत नाही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक ताण होत असून या विरोधात वंचित बहुजन माथाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष विशाल सरवदे यांनी क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त साहेब यांच्या नावे पत्र देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *