पूणे: हातात पिस्तूल घेऊन चाळीत गोंधळ: कोथरूडमध्ये खळबळ; व्हिडिओ व्हायरल

n6525728371739942549405ba43f1dc478ac3de1d9697df14c09305b0bbd04c2180fc3db23016007b4cbaf8.jpg

पुणे : पुण्यातील कोथरूड भागात पुन्हा एकदा गुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. चाळीमध्ये हातात पिस्तूल घेऊन ३-४ तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या तरुणांनी लोकांच्या घराबाहेर जाऊन शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या स्थानिकांनी तात्काळ कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुंडांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

पुण्यात मागील काही काळापासून अशा घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी मावळ तालुक्यातील देहूरोड भागात गोळीबाराच्या घटनेत विक्रम रेड्डी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सराईत गुन्हेगार शाबीर आणि फैजल यांनी रेड्डी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात नंदकिशोर यादव गंभीर जखमी झाले होते.

पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना केल्या असल्या, तरी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांनी या घटनांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Spread the love