पुणे: अनधिकृत फ्लेक्सचा उपद्रव: नागरिकांची तक्रार अन् प्रशासनाची उदासीनता

n6413949451732938112665a26d253e512c268be11a9ff99ba7daa9732302d63fc0b385a2f7697d18021c06.jpg

पुणे: कोथरूड आणि शिवाजीनगर भागात अनधिकृत फ्लेक्सच्या वाढत्या प्रमाणामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात लावण्यात येणाऱ्या या फ्लेक्समुळे पादचारी मार्ग अडले आहेत, तर वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणे कठीण झाले आहे.

लाकडी फ्लेक्सचा धोका
या फ्लेक्ससाठी बांधलेले लाकडी सांगडे जोरदार वाऱ्यात फाटून अपघात घडवण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण शहराचाच विद्रूप देखावा झाला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या दुर्लक्षामुळे हा त्रास वाढत असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

फ्लेक्स लावण्याचे हॉटस्पॉट
कोथरूडमध्ये कर्वे रोड, पौड फाटा, आनंद नगर भाजी मंडई, आणि कर्वेनगर परिसरात, तर शिवाजीनगरमध्ये सेनापती बापट रस्ता, दीप बंगला चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि आंबेडकर चौक अशा ठिकाणी फ्लेक्सचा प्रचंड त्रास आहे.

महापालिकेची मोहिम सुरू
महापालिकेने कालपासून फ्लेक्स हटवण्याची मोहिम सुरू केली आहे. “दिवसभरात ३०-३५ फ्लेक्स काढले असून, पुढील दोन-तीन दिवसांत सर्व फ्लेक्स हटवले जातील,” अशी माहिती आकाशचिन्ह परवाना निरीक्षक निलेश घोलप यांनी दिली. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांचा संताप
“फ्लेक्स लावून सार्वजनिक ठिकाणी अडथळे निर्माण करणे अत्यंत चुकीचे आहे. या फ्लेक्सवर ज्यांचे फोटो आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची नावे प्रसारमाध्यमांत जाहीर केली पाहिजेत,” अशी मागणी नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या अध्यक्षा शामला देसाई यांनी केली आहे.

निवडणुकीच्या प्रचारात शहराचा बळी
महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांकडून आमदार आणि नेत्यांना खूश करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात येत आहेत. मात्र, याचा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत असून, नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Spread the love

You may have missed