पुणे: संविधान दिनाच्या निमित्ताने नागपूरचाळ समता नगर, येथे भव्य कार्यक्रम

पुणे, २६ नोव्हेंबर: नागपूर शाळा समता नगर येवडा येथे भिमसैनिक युवा संघ यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक दिवशी देशाला जगातील सर्वात मोठे संविधान प्राप्त झाले होते, याचे स्मरण करून संविधानाच्या महत्त्वाची जाणीव जनमानसात रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या बालकांनी संविधानावर विचार मांडून केली. या विचारमंथनाने उपस्थितांचे लक्ष वेधले. यानंतर प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलेले मा. मिलिंद माचले सर आणि मा. दिलीप कुसाळे सर यांनी संविधानाचा मूलभूत पाया, त्याचे मूल्य, आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी त्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्रिरत्न कलाकार मंडळाने “महामानवाची यशोगाथा” या भिमगीतांच्या सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुमधुर गाण्यांनी कार्यक्रमातील वातावरण मंगलमय झाले.
भिमसैनिक युवा संघाने संविधानाची जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संविधान तयार होण्यामागील संघर्ष, त्याचे ऐतिहासिक महत्त्व, आणि त्याच्या अंमलबजावणीचे परिणाम यावर उपस्थितांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धिवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन धवल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष उगाडे, सुदर्शन देवकाते, रविंद्र कांबळे, अमित अल्लाट, अनिल पगारे आणि रोहित लोखंडे यांनी उत्सवाचे नेतृत्व केले.
प्रमुख उपस्थिती:
डाॅ. सिद्धार्थ धेंडे, नाना नलवडे, अजय बल्लाल, आणि राकेश मोहिते या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला अधिक भारदस्त बनवून गेली.
स्टेजची आकर्षक सजावट अरुण कसबे यांनी केली. नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत हा संविधान दिन संस्मरणीय केला.