अक्कलकोट: दिपावलीच्या निमित्ताने समाजसेवक भिमा अंदेनी यांच्याकडून फराळ वाटप

0

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व भिमा अंदेनी उर्फ अल्लापूर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक रिपब्लिकन पक्ष (आठवले) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केले. अंदेनी यांचे कार्य सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र जोडून एकोप्याची भावना निर्माण करणारे असल्याचे झळकी यांनी व्यक्त केले.

भिमा अंदेनी हे दुधनीचे आडत युवा व्यापारी असून, त्यांनी नेहमी शाळकरी मुलांना, तसेच गोर-गरीब आणि होतकरू मुलांना विविध सणांच्या निमित्ताने खाऊ, धान्य व अन्य साहित्याचे दान केले आहे. यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानेही त्यांनी दुधनी भीमनगर व बुध्दनगर येथील सर्वांना दिवाळी फराळ, चिवडा व लाडू प्रत्येकी एक किलो प्रमाणे वाटप केले.

फराळ वाटप कार्यक्रमाच्या वेळी सैदप्पा झळकी यांनी असे उद्गार काढले की, “अशा विधायक कार्यासाठी मोठ्या मनाचे व धाडसाचे असावे लागते, जे भिमा अंदेनी यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण समाजाने मनापासून कौतुक करायला हवे.”

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि युवा व्यापारी मल्लिनाथ योगदान यांनी भूषवले होते. यावेळी बसव प्रतिष्ठानचे अंबण्णा निंबाळ, शांतता वागदर्गी, संतोष कोतली, आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed