येरवडा: निधन वार्ता माजी नगरसेवक संजय भोसले यांच्या पत्नीचे निधन

0
IMG_20260829_102429

येरवडा : महाराष्ट्र माझा न्युज- प्रतिनिधी येरवड्याचे माजी नगरसेवक संजय भोसले यांच्या पत्नी अॅड. सौ. अश्विनी संजय भोसले (वय ४८) यांचे आज दि.29/08/2026 रोजी पहाटे ३ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संजय भोसले हे येरवड्यातून तीन बेळा नगरसेवक झाले होते. यावेळी भाजपकडून संजय भोसले यांनी प्रभाग क्रमांक ६ येरवडा तर पत्ती अश्विनी यांनी प्रभाग क्रमांक १३ येरवडा पुणे स्टेशन येथून निवडणूक लढवली होती. दोघांचाही कमी मतांनी पराभव झाला होता. अश्विनी भोसले यांना मध्यरात्री त्रास होत असल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती संजय भोसले, मुलगा कु. दुर्गेश संजय भोसले, दीर चंद्रकांत भोसले असा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी दि. 29/08/2026 रोजी, दुपारी 1 वाजता येरवडा, पुणे स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याची माहिती भोसले कुटुंबीयांनी दिली.

Spread the love

Leave a Reply