येरवडा: तारकेश्वर ब्रीजजवळ पुन्हा खड्डा; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला – पहा व्हिडिओ

IMG_20250504_011252.jpg

पुणे – येरवडा पर्णकुटी चौकाजवळील तारकेश्वर ब्रीज परिसरात पुन्हा एकदा रस्त्यावर मोठे भगदाड (खड्डा) पडल्याचे दि. ३ मे २०२५ रोजी सकाळी उघडकीस आले. तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी असेच भगदाड पडले होते. पुन्हा त्याच स्वरूपाचा अपघाताचा धोका निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते आणि विशाल शेलार यांना रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा दिसून आला. नागरिकांना इशारा मिळावा म्हणून त्यांनी झाडांच्या फांद्या त्या ठिकाणी ठेवून तात्पुरता उपाय केला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता मनोज शेट्टी यांच्या मदतीने बॅरिगेट आणून खड्ड्याच्या मागील बाजूस ठेवल्याने संभाव्य अपघात टळला.

पहा व्हिडिओ

या खड्ड्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले असून, या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Spread the love

You may have missed