दुबईहून आले, पण पुण्यात लुटले गेले! पुणे विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – व्हिडिओ

पुणे – पुणे विमानतळावरून एक गंभीर घटना समोर आली आहे. दुबईहून परतलेल्या प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सुयोग सपकाळ असे संबंधित प्रवाशाचे नाव असून, त्यांनी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. सपकाळ हे दुबईहून पुण्याकडे प्रवास करत असताना त्यांनी आपल्या बॅगेत दीड लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. मात्र, पुणे विमानतळावर आगमनानंतर बॅग उघडून पाहिली असता लॉक तुटलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बॅग तपासल्यावर रोख रक्कम गायब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
पहा व्हिडिओ
Link source: Pune mirror
या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता यावर प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचार्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे प्रवाशांमध्ये भय आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, विमानतळ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.