सावधान! राज्यात 5 ते 9 जुलैदरम्यान तुफान पावसाचा इशारा; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट

0
n671341365175177753314861ce7a4865819f090491f8494ece33f1deb3b5a788a9d5005155f428bb97ba81.jpg

मुंबई | प्रतिनिधी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पृथ्वी मंत्रालयाच्या संयुक्त अंदाजानुसार, 5 जुलै ते 9 जुलै 2025 दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने या कालावधीत राज्यातील विविध भागांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिले असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




घाटमाथ्यावर रेड अलर्ट

6 व 7 जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, पर्वतरांगांमध्ये भूस्खलन, झाडे उन्मळणे, वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे.




कोकणसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

5 जुलै रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

6 जुलै रोजी मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी, तसेच कोल्हापूर, सातारा, नाशिक घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट आहे.

7 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक व साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

8 जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम असून उर्वरित भागात पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.




राज्यात यलो अलर्ट असलेले जिल्हे

या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.




नागरिकांना सूचना

राज्य सरकार व हवामान खात्याने नागरिकांना पुढील काही दिवस प्रवास करताना काळजी घेण्याचे, नदीनाल्यांपासून दूर राहण्याचे, तसेच शालेय संस्था, शेतकरी व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




संपूर्ण राज्यात पावसाचा जोर

या चार दिवसांच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाचा जोर लक्षात घेता, काही ठिकाणी शाळा-कॉलेजांमध्ये सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.


Spread the love

Leave a Reply