आज पुण्याच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी नोंद घ्यावी

water-supply-1024x538-1.jpg

पुणे | प्रतिनिधी
पर्वती HLR चौकोनी टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात आज, बुधवारी (५ जून) पाईपलाइन दुरुस्ती व जोडणीची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा विभाग (पॅकेज १) अंतर्गत होणार असून, संबंधित भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

महापालिकेच्या माहितीनुसार, या कामामुळे ५ जून रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी (६ जून) सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा आवश्यक साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🔹 पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे –

तावरे कॉलनी

वाळवेकर नगर

सातारा रोड परिसर

इलेक्ट्रॉनिक इस्टेट

पर्वती इंडस्ट्रीअल इस्टेट

ट्रेझर पार्क

अण्णाभाऊ साठे वसाहत

संतनगर

महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी

शिवदर्शन

अरण्येश्वर

महर्षीनगर

आदर्शनगर

मुकुंदनगरचा काही भाग

प्रेमनगरचा काही भाग

गुलटेकडी

मार्केट यार्डचा काही भाग


महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा व अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love