पुण्यात विमाननगर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल, नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

n65044229917386491373380b191e06a727322c8eaaef3c0069aab303f38d207d01915ed25012a537fc4adf.jpg

पुणे: शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पुणे पोलिसांनी विमाननगर वाहतूक विभागांतर्गत काही तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

नवीन वाहतूक व्यवस्था कशी असेल?
विमाननगर येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी विमाननगर चौकातून डावीकडे वळून सोमनाथ नगर चौकातून यू-टर्न घ्यावा.

नगरकडून पुण्याकडे येणाऱ्या तसेच विमाननगर फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांनी अग्निबाज गेटसमोरून यू-टर्न घ्यावा.


नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदविता येणार
या वाहतूक बदलांबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत नागरिकांनी पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पुणे यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात आपले मत नोंदवावे.

अंतिम आदेश लवकरच जाहीर होणार
नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्यानंतर आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed