पुणे : शहरातील रेशनधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका; लाभार्थी धान्यापासून वंचित! अन् महाऑनलाइनचे सर्व्हर सुद्धा ठप्प

IMG-20240729-WA0016-780x470.jpg

विद्यार्थ्यांसह लाभार्थीची हजारो प्रमाणपत्रे रखडली

पुण्यातील पुरवठा विभागातील शिधापत्रिका ऑनलाईन करणारे सर्व्हर बऱ्याच दिवसापासून संथ गतीने सुरु व वेळोवेळी बंद होत असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन शिधापत्रिका मिळत नसल्याने महिलांमधून नाराजीचा सुर ऊमटत आहे.

पुण्यातील ई परिमंडळ पुरवठा विभागात मोठी गर्दी होत असून नवीन ऑनलाईन शिधापत्रिका नागरीकांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पुरवठा विभागात वाद होत आहे.

तसेच महा-ई सेवा सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांत विद्यार्थी आणि लाभार्थ्यांची अपलोड केलेली हजारो प्रमाणपत्रे महाऑनलाइनचे सर्व्हर ठप्प झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून अडकून पडली आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज दाखल केले होते. ते येण्याची वाट पाहत असताना शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. त्यात पहिल्या घोषणेनुसार उत्पत्र रहिवासी अधिवास प्रमाणपत्र आदीची आवश्यकता असल्याचे नमूद केल्यामुळे हजारो महिलांनी राज्यात अर्ज दाखल केले त्यामुळे सर्व्हर वर लोड देऊन तहसीलच्या ऑनलाइन डेस्क क्रमांक एक वरून संचिका पुढे जाणे थांबून गेले आहे.

नोकरभरती, शैक्षणिक प्रवेशाला मोठा अडथळा
लाड़की बहीण’ योजनेचे निकष नंतर बदलून ३१ ऑगस्ट ही अर्ज दाखल करुण्याची अंतिम तारीख घोषित केली. अगोदर दाखल केलेल्या ऑनलाइन अर्जामुळे अनेक नोकरभरती आणि दहावी, बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुदतीच्या आत प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे शैक्षणिक प्रवेशापासून बाधित राहू शकतात. तसेच सध्या पोलिस भरती सुरूआहे. कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे करीअर वाया जाण्याची भीती तरुणांकडून व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी शासनाचे प्रमाणपत्र देण्याची सात दिवसांची मुदत उलटून गेल्यामुळे अर्ज दाखल केलेले अर्जदार आणि महा-ई-सेवा केंद्रचालक यांच्यात चकमक होत आहेत. केंद्रचालकदेखील हताश झाले आहेत.

“पोलिस भरतीच्या जागा निघाल्यामुळे गेल्या महिन्यात ‘ईएसबीशी प्रमाणपत्रासाठी महा-ई-सेवा केंद्रात अर्ज दाखल केला होता. मात्र शासनाने ते प्रमाणपत्र रद्द करून नव्याने सुधारित प्रमाणपत्र काढण्याचा आदेश दिला आहे. परंतू वेळोवेळी सर्व्हर डाऊन असल्याने दाखला वेळेत मिळत नाही.”
शिफा हन्नोरे, विद्यार्थिनी

Spread the love