पुणे: बडतर्फ पोलिसांची पुनर्नियुक्ती: ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याने खळबळ

lalit-patil.jpg

पुणे : ललित पाटील ड्रग्स तस्करी प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या चार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा पोलीस दलात नियुक्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृह विभागाने पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा सामील करून घेतले आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटीलला पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्स तस्करीसाठी मदत केल्याच्या आरोपावरून मोहिनी डोंगरे, हवालदार राजेश काळे, नाथाराम काळे, दिगंबर चंदनशिव आणि अमित जाधव यांना काही महिन्यांपूर्वी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात पाटीलच्या ड्रग्ज तस्करीतील सहभाग उघड झाल्यानंतर हे अधिकारी आणि कर्मचारी देखील आरोपांच्या फेऱ्यात आले होते.

तथापि, बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याने वाद निर्माण झाला असून यावर अधिक चौकशीची मागणी जोर धरत आहे.

Spread the love