पुणे: हुक्का पार्लर चालकाला गुप्त माहिती देणाऱ्या PSI व मार्शलवर कारवाई; दरमहा २० हजारांची डील उघड – पोलिसांचा गुप्त इशारा महागात पडला

IMG_20250508_114447.jpg


पुणे, प्रतिनिधी –
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील ११ हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पार्लर चालकाला पुढे पोहोचवणाऱ्या दोन पोलिसांविरोधात शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बडतर्फीच्या ऐवजी दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची सौम्य शिक्षा देण्यात आली आहे.

“पोलीसनामाने” दिलेल्या वृत्तानुसार, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार आणि पोलीस मार्शल हरिचंद्र पवार अशी या दोषी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विशाल पवार याने प्रशिक्षणादरम्यान पोलिस आयुक्तांचा मेसेज ‘विजेता हॉटेल’चे चालक राहुल जैनसिंघाल यांना पाठवून त्यांना सतर्क केले होते. कारवाईपूर्वीच ही माहिती मिळाल्याने संबंधित हुक्का पार्लरने तत्काळ हुक्का सेवा थांबवली होती.

यासंदर्भात जैनसिंघाल यांनी जबाबात विशाल पवार याला दरमहा २० हजार रुपये देत असल्याचा खुलासा केला आहे. दुसरीकडे, पोलीस मार्शल हरिचंद्र पवार यांनी देखील संबंधित व्यावसायिकाला फोन करून सावध करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक मानून बडतर्फी टाळण्यात आली असून, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

— समाप्त —

Spread the love

You may have missed