राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने सरकारी जमिनीवर कब्जा करण्याचा कट उघड? धंगेकरांचा आरोप – व्हिडिओ

n6347206131728714387931a28036ddb8f163600e9c99c9f4b2858d5ed7a1fb6d67a7b8999ef534af759a60.jpg

पुणे: कसबा विधानसभेचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांच्या मते, पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन बेकायदेशीर पद्धतीने हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि यामागे विखे पाटील यांचे समर्थन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

धंगेकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. त्यांनी आरोप केला की, मावळ तालुक्यातील चांदखेड गावातील 31 एकर सरकारी जमीन, जी कासारसाई धरण प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव होती, ती बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा व्हिडिओ

विखे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर आरोप

रवींद्र धंगेकर यांच्या मते, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निकटवर्तीय सचिन शिंदे आणि श्वेता आचार्य यांनी या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नियम डावलले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे बेकायदेशीर साठेखत व पावर ऑफ ॲटर्नी तयार केले असून, सरकारच्या आदेशाविरोधात ही जमीन हस्तांतरित केली जात आहे.

धंगेकर यांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

जमीनवाटप धोरणांकडे दुर्लक्ष

धंगेकर यांनी असेही म्हटले आहे की, कासारसाई प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीनवाटपास गेल्या अनेक वर्षांपासून स्थगिती होती, मात्र आता आर्थिक फायद्यासाठी ती स्थगिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी उठवली आहे.

Spread the love