पुण्यात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या – व्हिडिओ

n6290874071725216415885fad435a7675cd0cd40e110d79f76f7910f927f1b08f5d156520dc0aeeb882e7f.jpg

पुण्यातून एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार झाला आहे.

ही घटना नाना पेठेत घडली असून, गोळीबारानंतर आंदेकरांवर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला आहे.

Link source: lokmat.com

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर एका घरगुती कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे सहकारी सोबत नसल्याचा फायदा घेत, वनराज आंदेकर यांच्या चुलत बहिणीचा नवरा बंडू अंदेकर यांचे जावई गणेश कोमकर यांनी आंदेकरांवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाला सील केले व पोलिस बंदोबस्त तैनात केला. गोळीबारानंतर आंदेकर यांना तात्काळ पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Spread the love