वारजेत भरदिवसा पथदिवे सुरू; महापालिकेच्या विद्युत विभागाचे लक्ष कुठे?

0
IMG_20261101_14491414

वीज बचतीच्या आवाहनाला हरताळ; सार्वजनिक विजेचा अनावश्यक वापर रोखण्याची जबाबदारी कोणाची?

ठिकाण : वारजे, पुणे | दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६

पुणे : वारजे परिसरातील हायवे सर्व्हिस रस्ता तसेच एनडीए रोडवर रविवारी भरदिवसा पथदिवे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार असल्याने संबंधित ठिकाणी नियमित देखभाल किंवा दुरुस्तीचे काम सुरू असण्याची शक्यता कमी असताना पथदिवे सुरू राहण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे वीज बचतीचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे सार्वजनिक रस्त्यांवरील पथदिवे भरदिवसा सुरू राहतात. यामुळे अनावश्यक वीज वापर होत असून सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पथदिव्यांच्या वेळेचे नियंत्रण, स्वयंचलित यंत्रणा आणि नियमित देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका विभागाची नाही का? दिवसा पथदिवे सुरू असल्याची बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत नाही का? की या व्यवस्थेवर कोणाचेही प्रभावी नियंत्रण राहिलेले नाही?

महापालिकेच्या विद्युत विभागाने या प्रकाराची दखल घेऊन पथदिवे दिवसा सुरू राहण्याचे कारण स्पष्ट करावे. तसेच वेळेचे योग्य नियंत्रण, नियमित तपासणी आणि अनावश्यक वीज वापर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed