पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा! तापमानात घट होणार; पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

0
Untitled-1_202605201512264273_H@@IGHT_400_W@@IDTH_600

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली असून, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शहर आणि परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ३१) पुणे शहराच्या कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसने घट होऊन ते ३२ अंशांवर आले. मात्र, किमान तापमानात तीन अंशांनी वाढ होऊन ते २२.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी आणि रात्री काहीसा गारवा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

दरम्यान, रविवारी (ता. १) कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याची, तर किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असले, तरी दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने तापमानात आणखी घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांचे लक्ष आता हवामानातील या बदलाकडे लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed