पुण्यात ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजे अन् लेझर लाईट्सचा धुडगूस; ११ जणांवर गुन्हे दाखल!

IMG_20260831_141735

Oplus_16908288

पुणे: शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक (डीजे/डॉल्बी) वाजवणे, लेझर व शार्पी बीम लाईट्सचा वापर करणे आणि सार्वजनिक रस्त्यावर धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. सहकारनगर, खडकी, कोंढवा आणि लष्कर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ६ स्वतंत्र गुन्हे नोंदवून मंडळांचे अध्यक्ष, डीजे चालक आणि ट्रॅक्टर चालकांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहर पोलीस सह-आयुक्त आणि विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी मिरवणुकीत लेझर बीम लाईट्स, शार्पी लाईट्स, हाय-डेसिबल डीजे सिस्टीम व फटाके फोडण्यावर स्पष्ट बंदी घालणारे मनाई हुकूम जारी केले होते. या अटींची पूर्ण कल्पना असूनही नियमांची पायमल्ली केल्यामुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सहकारनगर पोलीस ठाणे:
लाउडस्पीकर चालक सिद्धार्थ अनिल जाधव (वय २६, रा. बारामती), मंडळ अध्यक्ष तौसिफ खलील शेख (वय ३०, रा. दाते बस स्टॉप) आणि ट्रॅक्टर चालक उत्तम गोरख कांबळे (वय ४०, रा. आर. के. कॉलनी). दाते बसस्टॉप येथे डॉल्बी सिस्टीमवर मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे व वाहतुकीस धोका निर्माण करणे (बीएनएस २२३, २८५, २८९, २९२, २९३ सह पर्यावरण संरक्षण कायदा व ध्वनी प्रदूषण नियम).

खडकी पोलीस ठाणे:
‘हुसेनिया यंग सर्कल’ मंडळ अध्यक्ष इम्रान इसामुद्दीन इनामदार (वय ३७, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) आणि डीजे/लाईट चालक अमित कोंडीबा तापकीर (वय २८, रा. वडमुखवाडी).

कोंढवा पोलीस ठाणे:
‘एचएफ फ्रेंड्स सर्कल’ अध्यक्ष उमर शब्बीर शेख (रा. कोंढवा), डीजे चालक गणपत तुकाराम कामठे (वय ६०, रा. नऱ्हे), ‘झुल्फिकार बॉईज’ अध्यक्ष राहिल सय्यद मुजावर (रा. कोंढवा) व डीजे चालक अनवर इम्तियाज शेख (रा. पिंपळे गुरव).

लष्कर पोलीस ठाणे (ट्रायलक चौक, कॅम्प):
‘एकता विकास प्रतिष्ठान’ अध्यक्ष जाफर शफिक शेख (रा. पाटील इस्टेट), विनायक मधुकर नेहरे (वय ४३, रा. राजगुरूनगर), अरबाज पंजाबी (रा. कोंढवा) आणि सुशांत अशोक शेवाळे (वय ३६, रा. कराड).

(Pune Eid e Milad DJ Laser Light Case 11 Booked Sahakarnagar Khadki Kondhwa Laskhar Police August 2026, Sound Pollution Case Pune Police News Marathi)

#PunePolice #SoundPollution #LaserLightBan #EidEMilad #PuneCrime

Spread the love

You may have missed