गणेशोत्सव शांततेत साजरा करा; महाळुंगे पोलिसांचा मंडळांना इशारा

0
mhalunge-police-1-700x375.jpg

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याची गणेश मंडळांसोबत बैठक

महाळुंगे (ता. खेड) : गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत डीजे, डॉल्बी व लेझर लाइट वापरण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी गणेश मंडळांना सूचना देताना सांगितले की, “गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावण्यास पूर्णतः बंदी आहे. जर मंडळांनी डीजेसाठी पैसे दिले असतील तर ते परत घ्यावेत. नियमभंग झाल्यास गुन्हे दाखल केले जातील.” तसेच मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिरे, वाचनालय सुरू करणे, समाजोपयोगी उपक्रम राबविणे यावर भर द्यावा, असेही आवाहन करण्यात आले.

बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले. अनंत चतुर्थी दिवशी महाळुंगे–कुरुळी परिसरातील मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी, विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशा मागण्या उपस्थितांनी केल्या.

या बैठकीला वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, पोलिस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply